आवाहन (Appeal to Readers)

नमस्कार मंडळी,
आज एका महत्वाच्या विषयासंबंधी आपल्याशी बोलणार आहे, तो विषय आहे भौतिकशास्त्र किंवा पदार्थविज्ञान किंवा Physics. न्यूटनची काही सूत्रे व काही formule याच्या पलिकडे या विषयात काही आहे असं फार कोणाला वाटत नाही. त्याला कारण म्हणजे ज्या पद्धतीने याविषया वरील पुस्तके लिहिली जातात आणि त्यातही गणिते सोडवून मार्क मिळवण्यावर भर दिला जातो त्यामुळे या विषयात काही मनोरंजक, मजेदार असू शकेल असं निदान त्या वयातल्या विद्यार्थ्यांना वाटत नाही..

पण या विषयाची गोम म्हणजे तुम्हाला Science ला जायचं असेल तर या विषयाशी सख्य करावंच लागतं..केवळ Physics आवडलं नाही म्हणून Science career सोडलेले खूप आहेत..शिवाय गोगलगाईच्या पोटात पाय असं म्हणतात तसं या Physics विषयाच्या पोटात Maths दडलेलं असतं..एकंदरच अवघड मामला..याचाच चुलत भाऊ Engineering Mechanics हा असून तो भल्याभल्यांना रडवतो..मुलांची वर्ष राहतात..मुलांना नैराश्य येतं..

या सर्व पार्श्वभूमीवर या विषयावर आधारीत गोष्टी मराठीत लिहाव्यात आणि मुलांचा ताण थोडा हलका करावा यासाठी मी एक ब्लॉग सुरु केला..यात विक्रम वेताळाच्या गोष्टींच्या रूपात या संकल्पना मांडत आहे..त्यात भर म्हणजे भारतातील पदार्थ विज्ञानाचे ४-५व्या शतकातील पुस्तक मिळाले..त्याचाही योग्य तेवढा संदर्भ देऊन गोष्टी लिहिल्या, लिहितोय..उद्देश एवढाच की मुलांनी निदान पास होण्यासाठी तरी अभ्यास करावा व नैराश्यातून सुटावं..त्याच साठी सारा खटाटोप..

  • तुम्ही अशा विद्यार्थ्यांचे पालक असाल तर या ब्लॉग चा संदर्भ म्हणून वापर करून मुलांना संकल्पना समजवू शकता..
  • स्वत: शिक्षक असाल तर शिकवण्यात थोडी मजा आणू शकता..
  • विद्यार्थी असाल तर ताण थोडा हलका करू शकता..
  • या विषयात नापास झालेल्या, हा विषय जड जाणाऱ्या, हा विषय अजिबात न आवडणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांना हा ब्लॉग वाचायला सांगून थोडी मदत करु शकता..

काही सुधारणा सुचवायच्या असल्यास सुचवू शकता..जरूर विचार केला जाईल ..प्रतिक्रीया कळवा..वाचायचे पैसे पडत नाहीत!!!

कथांची यादी: विषय सूची (Topic Index)