प्रकरण ४ भाग ४: वायू (Discussion on characteristics, properties and classification of gas)

४.४: ४४वायुत्वाभिसम्बन्धाद्वायुः ।
Air is that which belongs to the class ‘Air’.
वायू या वर्गात येणारी सर्व द्रव्ये वायू होत.
स्पर्शसङ्ख्यापरिमाणपृथक्त्वसम्योगविभागपरत्वापरत्वसंस्कारवान् ।
It has the following qualities: temperature, dimension, isolation, conjunction, disjunction, proximity, distance and ability to apply force.
वायूचे तापमान, संख्या, परिमाण, वेगळेपणा, जोडलेपणा(येउन जुळणे), विभक्तपणा(लांब जाणे), अंतर, जवळीक(सान्निध्यात राहणे), वहनक्षमता आणि बळ लावण्याची क्षमता या सर्व आहेत.
४.४: ४४स्पर्शोऽस्यानुष्णाशीतत्वेसत्यपाकजः।
The temperature of air is neither hot nor cool and it is not because of the cooking.
वायू हा ना उष्ण असतो, ना थंड असतो व त्याचे हे तापमान पाकक्रिया आदि बाह्यकारणाने प्राप्त झालेले नसते. ते अंगभूत असते.
गुणविनिवेशात्सिद्धः।
This is indicated by the Sutra which lays down that temperature is the quality of air.
हीच गोष्ट ‘तापमान हा वायूचा गुणधर्म आहे’ असे प्रतिपादन करणाऱ्या वैशेषिक सूत्रातही दिलेली आहे.
———————————–
स्पर्शवान् वायु: (२/१/४)
Air has temperature.
वायूला तापमान असते.
तृणे कर्म वायो: संयोगात् ‌(५/१/१४)
When air comes in contact with grass, the grass moves. That means air can apply force.
वायूचा संपर्क झाला असता गवताची हालचाल होते. याचा अर्थ वायू हा बळ लावू शकतो.
————————————
अरूपिष्वचाक्षुषऽ-वचनात्सप्तसङ्ख्यादयः।
Air does not have a colour, neither can it be seen.
The existence of seven qualities beginning with number, in the colourless air is indicated by the Sutra though of the number and other qualities are not visible.
वायूला रंग नसला, ती दिसत नसली तरीही तिचे संख्या इत्यादि सात गुणधर्म आहेत हे वैशेषिक सूत्रातील चाक्षुषवचनामुळे कळते.
तृणकर्मवचनात्संस्कारः ।
The ability of the air to apply force is indicated by the mention of the shaking of grasses being due to the contact of air.
हवेचा गवताशी संपर्क आल्याने गवत उडते या अर्थी हवेला बळ लावता येते हे कळते.
४.४: ४४सचायम्द्विविधोऽणुकार्यभावात् ।
Air is of two types: in the shape of atoms and their products.
हवेची दोन रूपे – सूक्ष्मरूप आणि स्थूलरूप.
४.४: ४४तत्रकार्यलक्षणश्चतुर्विधःशरीरमिन्द्रियम्विषयःप्राणैति ।
The products are fourfold-in the shape of body, the sense organ, the object and the breath.
स्थूलरूपातील हवेचे चार प्रकार आहेत – शरीर, इंद्रिय, वस्तू आणि प्राण.
४.४: ४४तत्रायोनिजमेवशरीरम्मरुताम्लोकेपार्थिवावयवोपष्टम्भाच्चोपभोगसमर्थम् ।
The airy body is not born from the womb, and is known to exist in the region of Maruts. It is made capable of experiencing sensations by the reason of the admixture of the earth particles.
हवेत उडणारी शरीरे ही मातेच्या उदरातून जन्मास येत नाहीत. ही शरीरे वायू आणि स्थायू यांच्या मिश्रणातून तयार झालेली असून याद्वारे ती विविध सुख आणि दु:खांचा अनुभव घेतात.
४.४: ४४इन्द्रियम्सर्वप्राणिनाम्स्पर्शोपलम्भकम्पृथिव्याद्यनभिभूतैर्वाय्ववयवैरारब्धम्सर्वशरीरव्यापित्वगिन्द्रियम् ।
The Airy sense organ pervading all over the body is that of temperature, which enables all the living beings to feel temperature through touch. It is made up of air molecules exclusively and it is free from the molecules of all other substances.
शरीरात सर्वत्र पसरलेले वायुमय इंद्रिय हे त्वचेंद्रिय असून त्याद्वारे सर्व सजीवांना स्पर्शाच्या माध्यमातून तापमानाची जाणीव होते. हे इंद्रिय निव्वळ सूक्ष्मरूपातील वायूंचे बनलेले असून त्यात इतर कोणत्याही द्रव्याचा अंतर्भाव होत नाही.
४.४: ४४विषयस्तूपलभ्यमानस्पर्शाधिष्ठानभूतःस्पर्शशब्दधृतिकम्पलिङ्गस्तिर्यग्गमनस्वभावोमेघादिप्रेरणधारणादिसमर्थः ।
The airy object is that which is actually perceived as air, the substratum of all temperature through touch. Its existence is indicated by temperature, sound, steadiness and shaking. It moves horizontally and is capable of moving and holding the clouds and other things.
आपण जिला हवा असे म्हणतो ती वायुमय वस्तू ही स्पर्शातून समजणाऱ्या तापमानामुळेच कळते. तिचं अस्तित्व हे तापमान, आवाज, स्थिरपणा व सळसळ इत्यादिंमधून कळते. ती तिरक्या दिशेत प्रवास करते आणि ती ढग इत्यादि वस्तूंना धारण करते.
४.४: ४४तस्याप्रत्यक्षस्यापिनानात्वम्सम्मूर्च्छनेनानुमीयते।
Though air is not visible, yet its numerousness is inferred from the collapse of winds.
हवा दिसत नसली तरीही वातावरणात होणाऱ्या दोन वाऱ्यांच्या टकरीतून त्यात अनेक वायूंचा समावेश असतो हे कळते.
सम्मूर्च्छनम्पुनःसमानजवयोर्वाय्वोर्विरुद्धदिक्क्रिययोःसन्निपातः।
This collapse being due to the collision of two contrary winds blowing with equal velocity.
वायूंची ही धडक वातावरणात परस्पर विरुद्ध दिशेत, पण समान वेगाने वाहणाऱ्या वायूंमुळेच होते.
सोऽपिसावयविनोर्वाय्वोरूर्ध्वगमनेनानुमीयते॑तदपितृणादिगमनेनेति ॥
This collision is inferred from the upward motion of air – this upward motion is again inferred from the fact of the tufts of grass and other things being seen to rise in air(whenever there is such a collision).
आकाशात वरच्या दिशेने होणाऱ्या वायूच्या वहनामुळे ही धडक झाल्याचा निष्कर्ष काढता येतो आणि ही हवा वरच्या दिशेने वाहत आहे हे सुद्धा अशा वेळी हवेत उडणाऱ्या गवत-पाचोळा इत्यादि वस्तूंच्या हालचालींमधून कळते.
४.४: ४४प्राणोऽन्तह्सेरीरेरसमलधातूनाम्प्रेरणादिहेतुरेकःसन्क्रियाभेदादपानादिसंज्ञाम्लभते ॥
Breath is the air in the body, it serves the purpose of moving about the various fluids, secretions and other materials in the body. This air in the body comes to be known as ‘Prana’, ‘Apana’, ‘Samana’, ‘Udana’ and ‘Vyana’ on account of its various functions. (Moving up and down etc).
शरीरात असलेला वायु म्हणजे प्राण आणि तो शरीरातील विविध द्रव पदार्थांना, टाकून दिलेल्या द्रव्यांना आणि इतर पदार्थांना फिरवतो. त्याच्या विविध कामांनुसार त्या वायूला ‘प्राण’, ‘अपान’, ‘समान’, ‘उदान’ आणि ‘व्यान’ अशी नावे दिली गेलेली आहेत.

प्रशस्तपादभाष्य – अनुक्रमणिका

परत मुखपृष्ठाकडे – मुखपृष्ठ