प्रकरण ४ भाग ६: आकाश (Discussion on characteristics, properties and classification of plasma state)

६.१: ५८.५-आकाशकालदिशामेकैकत्वाद्परजात्यभावे पारिभाषिक्यस्तिस्रःसंज्ञाभवन्ति ।

Akash (Plasma), Time and Space having no lower species, these are three technical names given to individuals themselves.

आकाश, काल व दिक् किंवा दिशा यांच्यात स्थूलांश नसल्याने त्यांना स्वत:लाच ही नावे दिली गेलेली आहेत. त्यांच्यात स्थूल व सूक्ष्म ही दोन्ही एकच आहेत.

आकाशः कालोदिगिति ।

Plasma, Time and Space are those terms.

आकाश, काल व दिक् ह्या त्या संज्ञा होत.

तत्राकाशस्यगुणाःशब्दसंख्यापरिमाणपृथक्त्वसम्योगविभागाः ।

Of Plasma, the qualities are – sound, number, dimension, separateness, conjunction and disjunction.

त्यातील आकाशाचे गुण म्हणजे शब्द/ध्वनि, संख्या, मोजण्याचे एकक असणे, वेगळेपणा, जुळणे आणि विभक्त होणे.

६.१: ५८शब्दः प्रत्यक्षत्वेसत्यकारणगुणपूर्वकत्वात्

(1) Because, being perceptible, its production is not proceeded by any quality in the material cause of the substance (to which it belongs).

शब्द हा जाणिवेला प्रत्यक्षपणे कळत असल्याने त्याच्याशी जो द्रव्यातून निर्माण झाला त्याच्या गुणांशी काहीही संबंध नसतो.

अयावद्द्रव्यभावित्वात्

(2) Because it does not pervade over and is not coeval with the substance to which it belongs

शब्द हा स्थूल जागा व्यापत नाही आणि ज्या द्रव्यापासून तो निर्माण झाला त्याद्रव्याशी तो संबंधित नसतो.

आश्रयादन्यत्रोपलब्धेश्च

(3) Because it is perceived elsewhere than in the substratum wherein it is produced

तो ज्या द्रव्यापासून निर्माण होतो त्यापेक्षा वेगळ्याच जागी तो जाणवतो.

नस्पर्शवद्विशेषगुणः।

Sound does not have properties such as temperature.

शब्दाला तापमान नसते. त्यामुळे स्पर्शाद्वारे तो जाणवत नाही.

बाह्येन्द्रियप्रत्यक्षत्वात्

(1) Because it is perceptible by an external sense organ

तो बाह्य जाणीवेच्या इद्रियाने जाणता येतो.

आत्मान्तरग्राह्यत्वात्

(2) Because it is perceived by other souls

तो इतर आत्म्यांनाही जाणून घेता येतो.

आत्मन्यसमवायात्

(3) Because it is not found to inhere in the soul

शब्द हा आत्म्यातून निर्माण होत नाही.

अहङ्कारेणविभक्तग्रहणात् च अनात्मगुणः ।

(4) Because it is perceived as apart from all idea of ‘I’.  It cannot be regarded as being as belonging to soul.

कोणाच्याही स्वत्वाच्या जाणिवेपेक्षा शब्द किंवा आवाज हा वेगळा असतो. त्यामुळे तो आत्म्याचा गुण आहे असे म्हणता येत नाही.

६.१: ५८श्रोत्रग्राह्यत्वात्

(1) Because it is perceived by the Ear.

तो कानाने जाणता येतो.

वैशेषिकगुणभावाच्चनदिक्कालमनसाम्।

(2) Because it is a Visheshguna (specific quality) and It cannot be the quality of space, time and mind.

आकाशाचा(plasma) तो विशेष गुण किंवा सूक्ष्म गुण असल्याने त्याच्यात दिक्, काल आणि मन यांचे गुण नसतात.

परिशेषाद् गुणोभूत्वाआकाशस्याधिगमेलिङ्गम्।

Thus the only substance to which it could belong as a quality, and be a distinguishing feature of, is Akasha.

त्यामुळे शब्द हा कोणत्या द्रव्याचा शब्द आहे असे म्हणायचे झाल्यास तो आकाशाचा गुण आहे असे म्हणावे लागते.

शब्दलिङ्गाविशेषाद् एकत्वम्सिद्धम् ।

As the distinguishing feature of sound is common to all Akasha, this is regarded as one only.

आकाशद्रव्यात(plasma) शब्द हा सर्वत्रच आढळत असल्याने त्यांच्यात एकत्व आहे असे म्हणायला हवे.

६.१: ५८तदनुविधानादेकपृथक्त्वम् ।

From this unity follows its individual separateness or isolation.

या एकत्वामुळे किंवा अन्योन्य संबंधामुळे ते इतर द्रव्यांपासून वेगळे आहे हे जाणवते.

विभववचनात्परममहत्परिमाणम्।

Akasha being spoken of as Vibhu(omnipresent or all pervading), it points to its dimension being the largest or highest.

आकाश हे सर्वदा सर्वत्रच आढळत असल्याने ते सर्वात मोठे असल्याचे जाणवते.

शब्दकारणत्ववचनात् सम्योगविभागाविति ।

In as much as Akasha is spoken of as the cause of sound, it follows that it has conjunction and disjunction.

ध्वनीच्या निर्मितीला आकाश हे कारण असल्याचे म्हणलेले असल्याने त्यात येऊन जुळण्याचे व वेगळे होण्याचे गुण आहेत हे कळते.

६.१: ५८अतोगुणवत्त्वाद् अनाश्रितत्वाच्चद्रव्यम् ।

Thus then, being endowed with qualities and not being located in anything else, it is regarded as a substance.

अशा तऱ्हेने आकाशाला स्वत:चे गुणधर्म असल्या कारणाने व ते इतर कोणत्याही द्रव्यामध्ये ते राहात नसल्याने आकाश(plasma) हे एक वेगळे द्रव्य म्हणूनच ओळखले पाहिजे.

समानासमानजातोयकारणाभावाच्चनित्यम् ।

And in as much as it has no cause, either homogeneous or heterogeneous, it is eternal.

कोणत्याही प्रकारच्या समतेमुळे किंवा असमतोलामुळे आकाश निर्माण होत नसल्याने ते अक्षय आहे असे समजले पाहिजे.

सर्वप्राणिनाम्चशब्दोपलब्धौनिमित्तम् श्रोत्रभावेन ।

In the shape of the auditory sense organ it is the cause of the perceiving of the sound, by all living beings.

ऐकू येण्याच्या अवयवाच्या माध्यमातून सर्वच सजीवांना ध्वनीची जाणीव होते.

६.१: ५८श्रोत्रम्पुनःश्रवणविवरसंज्ञकोनभोदेशः

The auditory sense organ is the name given to that part of Akasha which is called as the cavity of ear;

आकाशाच्या ज्या भागातून ध्वनीची जाणीव होते त्या भागाला कानाची पोकळी असे म्हणतात.

शब्दनिमित्तोपभोगप्रापकधर्माधर्मोपनिबद्ध:

It is aided by the virtue and the vice (of souls) that bring about the experiencing of the sound.

वेळोवेळी निर्माण होणारे चांगले- वाईट शब्द लक्षात घेतल्याने त्यांच्याशी संबंधित आत्म्यांच्या सद्गुण व दुर्गुणांचे ज्ञान होते.

तस्यचनित्यत्वेसत्युपनिबन्धकवैकल्याद्बाधिर्यमिति ॥

This sense organ being eternal (as a portion of Plasma/Akasha), deafness is caused by the derangement of its accessories.

कानाच्या पोकळीतील आकाश हे अविनाशी असल्याने बहिरेपणा आल्यास तो कानाच्या इतर भागातील बिघाडामुळेच आलाय असे समजावे.

प्रशस्तपादभाष्य – अनुक्रमणिका

परत मुखपृष्ठाकडे – मुखपृष्ठ