प्रकरण ४, भाग ५: महाभूते, निर्मितीची व विनाशाची प्रक्रिया (The five special substances and the process of Creation and Destruction)

५: ४८.७-इहेदानीम्चतुर्णाम्महाभूतानाम्सृष्टिसंहारविधिरुच्यते ।

We are now going to describe the process of the creation and destruction of the four ultimate substances.

आता आपण चार परमद्रव्यांच्या निर्मितीची आणि विनाशाची प्रक्रीया पाहूया.

ProcessOfCreation_vaisheshik

५: ४८.८-ब्राह्मणेमानेनवर्षशतान्ते वर्तमानस्यब्रह्मणोऽपवर्गकालेसंसारखिन्नानाम्सर्वप्राणिनाम्निशिविश्रामार्थम्

When a hundred years, by the measure of Brahma are at the end, there comes the time for the deliverance of the Shiva existing at that time; and then, for the sake of the resting at night, of all living beings wearied by their wanderings,’

ब्रह्माच्या १०० दिवसांनंतर महादेवाचा एक दिवस पूर्ण होतो आणि तेव्हा त्या रात्री सतत फिरून दमलेल्या जीवांना विश्रांती मिळावी म्हणून

सकलभुवनपतेर्महेश्वरस्यसंजिहीर्षासमकालम्शरीरेन्द्रियमहाभूतोपनिबन्धकानाम्सर्वात्मगतानामदृष्टानाम्वृत्तिनिरोधेसतिमहेश्वरेच्छा

There arises in the mind of the Maheshwara, the ruler of all worlds, the desire to reabsorb (all creation); and simultaneously with this desire, there comes about a cessation of the operations of the unseen potential tendencies of all souls that are the causes of their bodies, sense organs and gross elements.

सकळ सृष्टीचा राजा असलेल्या महादेवाच्या मनात तयार केलेल्या सर्व गोष्टी पुन्हा आपल्यात सामावून घेण्याची इच्छा निर्माण होतो आणि इच्छा झाल्याबरोबर जगातील सर्व शरीरांच्या जन्माला कारणीभूत असणाऱ्या सर्व आत्म्यांचे सर्व व्यवहार थंडावतात. हेच आत्मे शरीरे, ज्ञानेंद्रिये व विषय वस्तू यांच्या निर्मितीला कारणीभूत असतात.

आत्माणुसम्योगजकर्मभ्यःशरीरेन्द्रियकारणाणुविभागेभ्यस्तत्सम्योगनिवृत्तौ

Then out of the Maheshwara’s desire and from the conjunction of the souls and the material atoms, there comes about certain disruptions of the atoms constituting the bodies and sense organs.

आणि तेव्हा महादेवाच्या इच्छेने आणि सर्व आत्मे व पार्थिव वस्तूंचे अणू एकत्र आल्यामुळे शरीरे व ज्ञानेंद्रिये यांमधील अणूंमध्ये काही विशिष्ट बिघाड निर्माण होतात.

तेषामापरमाण्वन्तोविनाशः

These disruptions destroy the combinations of those atoms and this brings about the destruction of all things down to atoms.

या बिघाडामुळे वस्तूंच्या परमाणूस्तरावर असलेल्या संरचना नष्ट होतात व सर्व पदार्थ नष्ट होऊन ते सूक्ष्मस्तरावरील अणुरूपात शिल्लक राहतात.

५: ४८.१५-तथापृथिव्युदकज्वलनपवनानामपिमहाभूतानामनेनैवक्रमेणोत्तरस्मिन्नुत्तरस्मिन् सतिपूर्वस्यपूर्वस्यविनाशःततःप्रविभक्ताःपरमाणवोवतिष्ठन्तेधर्माधर्मसंस्कारानुविद्धाआत्मानस् तावन्तमेवकालम् ।

Then there comes about a successive destruction or the reabsorption of the ultimate material substances Earth, Water, Fire and Air, one after the other. After this the atoms remain by themselves in their isolated condition; and simultaneously with these there remain the souls permeated with the potencies of their past virtues and vices.

या परमाणुरूपातील द्रव्यांचा विनाश होत त्यांच्यापासून स्थायू, त्यापासून द्रव, त्यापासून अग्नि आणि शेवटी वायु या क्रमाने द्रव्ये निर्माण होतात. ती चारही द्रव्ये त्यांच्या अणुस्वरूपात पण विखुरलेल्या अवस्थेत राहतात व त्याबरोबरच आत्मेही त्यांचे चांगले व वाईट गुण बरोबरच घेऊन राहतात.

५: ४८.१९-ततःपुनःप्राणिनाम्भोगभूतयेमहेश्वरसिसृक्षानन्तरम्

Then again for the sake of the experiences to be gained by the living beings, there arising in the mind of the Maheshwara a desire for creation,

मग त्यानंतर सर्व आत्म्यांना जगण्याचा अनुभव मिळावा याकरिता परमेश्वराच्या मनात निर्मितीची इच्छा येते.

vaisheshik_ballofGas

सर्वात्मगतवृत्तिलब्धादृष्टापेक्षेभ्यस्तत्सम्योगेभ्यःपवनपरमाणुषुकर्मोत्पत्तौतेषाम्परस्परसम्योगेभ्योद्व्यणुकादिप्रक्रमेणमहान्वायुःसमुत्पन्नोनभसिदोधूयमानस्तिष्ठति ।

There are produced, in the atoms of air, certain actions or motions due to their conjunctions under the influence of unseen potential tendencies that begin to operate in all souls. These motions bringing about the mutual contact of the air atoms, there appears through the diad, triad etc finally the great air which exists vibrating in the sky.

या इच्छेमुळे विविध आत्म्यांच्या गुणांनुसार ते त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या वायूंवर बलप्रयोग करून त्यांच्यात चळण निर्माण करतात. या चळणामुळे ते वायूचे अणू एकमेकांशी जोडले जाऊन दोन-तीन-चार अणूंचे पुंजके जोडले जाऊन त्यापासून वायूचा एक मोठा ढग तयार होतो व तो आकाशात थरथरत राहतो.

vaisheshik_waterRes.png

५: ४९.१-तदनन्तरम्तस्मिन्नेववायावाप्येभ्यःपरमाणुभ्यस्तेनैवक्रमेणमहान्सलिलनिधिरुत्पन्नःपोप्लूयमानस्तिष्ठति

After this, in this Great Air, there appears in the same order, out of atoms of water, the great reservoir of water, which remains there surging

या हवेच्या अतिप्रचंड ढगात अशाच प्रकारे विखुरलेले आपद्रव्याचे अणु एकत्र येऊन त्यापासून एक अतिशय मोठा असा पाण्याचा महासागर निर्माण होतो व तो उसळत राहतो.

vaisheshik_solidMass

तदनन्तरम्तस्मिन्नेव पार्थिवेभ्यःपरमाणुभ्योमहापृथिवी संहतावतिष्ठते ।

In this reservoir of water, there appears out of Earth atoms, the great Earth which rests there in the solid form.

तशाच प्रकारे या पाण्याच्या महासागरात स्थायूंचे अणु एकत्र येत त्यांच्यापासून एक अतिशय महाकाय असे स्थायुद्रव्य आकाराला येते.

vaisheshik_ballofFire

५: ४९.५-तदनन्तरम्तस्मिन्नेवमहोदधौतैजसेभ्योऽणुभ्योद्व्यणुकादिप्रक्रमेणोत्पन्नोमहांस्तेजोराशिःकेनचिदनभिभूतत्वाद्देदीप्यमानस्तिष्ठति ।

Then in the same water-reservoir, there appears in the same order out of the Fire-atoms, the Great Mass of Fire; and not being suppressed by anything else, it stands shining radiantly.

मग त्यानंतर त्याच महासागरात तेजाचे सूक्ष्माणु एकत्र येउन त्यापासून अग्नीचा एक अतिप्रचंड गोळा आकाराला येतो व तो अतिशय तेजाने तळपू लागतो.

vaisheshik_hugeEgg

५: ४९.७-एवम्समुत्पन्नेन्षुचतुर्षुमहाभूतेषुमहेश्वरस्याभिध्यानमात्रात्तैजसेभ्योऽणुभ्यः पार्थिवपरमाणुसहितेभ्योमहदण्डमारभ्यते

The four gross elements having thus been brought into existence , there is produced from mere thought (mental picturing) of the Maheshwara the Great Egg, from out of the fire atoms mixed with the atoms of earth and in this egg

हे चारही अतिविशाल असे द्रव्यांचे समूह आकाराला आल्यानंतर, परमेश्वराने केवळ कल्पना चित्र तयार केल्याने तेजाचे अणू स्थायू, द्रव आणि वायू यांच्याशी संयोग पावतात व एक महाकाय अंडाकार निर्माण होतो.

तस्मिंश्चतुर्वदनकमलम्सर्वलोकपितामहम्ब्रह्माणम्सकलभुवनसहितमुत्पाद्यप्रजासर्गेविनियुङ्क्ते ।

Having produced all the worlds and the four faced Brahma, the Grandfather of all the creatures, the Maheshwara assigns him the duty of producing various creatures.

या अंडाकारात सर्वांना जन्म देणारा चतुर्मुख किंवा चार तोंडांचा ब्रह्म आणि सारे विश्व सामावलेले असल्याने परमेश्वर या ब्रह्माला सर्व प्राणीमात्रांना जन्माला घालण्याची जबाबदारी सोपवतो.

५: ४९.११-सचमहेश्वरेणविनियुक्तोब्रह्मातिशयज्ञानवैराग्यैश्वर्यसम्पन्नः

Being thus engaged by the Maheshwar, Brahma endowed with supreme degree of knowledge, dispassion, and power,

परमेश्वराने अश्याप्रकारे जबाबदारी दिलेला ब्रह्म हा पराकोटीचे ज्ञान, वैराग्य आणि सामर्थ्य यांनी संपन्न आहे.

प्राणिनाम्कर्मविपाकम्विदित्वाकर्मानुरूपज्ञानभोगायुषःसुतान्प्रजापतीन्मानसान्मौदेवर्षिपितृगणान्

having recognized the ripeness for fruition of the karmic tendencies of the living beings, creates out of his mind, his sons the Prajapatis, as also the Manus and the several groups of Gods, Rishis and Pitrs-

सर्व सजीवांची पूर्वकर्मे लक्षात घेउन त्यांना त्या कर्मांची फळे देण्याच्या दृष्टीने ब्रह्म हा त्याच्या मनातून त्याचे पुत्र म्हणजे प्रजापती, मनु, अनेक देव, ऋषी आणि पित्र तयार करतो.

मुखबाहूरुपादतश्चतुरोवर्णानन्यानिचोच्चावचानिभूतानिचसृष्ट्वाशयाणुरूपैर्धर्मज्ञानवैराग्यैश्वर्यैःसम्योजयतीति

and out of his mouth, arms, thighs and feet, the four castes, and the other living beings of all grades high and low,-all these having their knowledge and experience ordained in accordance with their previous deeds; and he connects them with virtue, knowledge, dispassion and powers, according to their respective impressional potencies.

शिवाय त्याच्या तोंड, हात, मांडी आणि पाय यांच्यापासून चार वर्ण आणि उच्च तसेच नीच श्रेणीचे अनेक जीव निर्माण करतो. या सर्व सजीवांना मिळालेले ज्ञान आणि अनुभव हे त्यांच्या पूर्वकृत्यांचा परिणामस्वरूप असतात. तो ब्रह्म त्या सर्व सजीवांना त्यांच्या पूर्वकर्माने प्राप्त झालेल्या क्षमतेनुसार गुण, ज्ञान, वैराग्य व सामर्थ्य प्रदान करतो.

मूळ पुस्तकाची अनुक्रमणिका : पदार्थधर्मसंग्रह – प्रशस्तपाद ऋषी

मुखपृष्ठ : मुखपृष्ठ