६.२: ६३.१५-कालःपरापरव्यतिकरयौगपद्यायौगपद्यचिरक्षिप्रप्रत्ययलिङ्गम् ।
The time is the cause of the contrary notions of Priority, Posteriority, of simultaneity and of succession and of late and soon.
आधी, नंतर, एकसाथ, एका-मागोमाग-दुसरा, उशीरा आणि लवकर ह्या परस्परविरोधी जाणीवा निर्माण करण्यासाठी काल हा कारणीभूत ठरतो.
तेषाम्विषयेषुपूर्वप्रत्ययविलक्षणानाम् उत्पत्तावन्यनिमित्ताभावाद्यद्
In as much as there is no other cause or basis for these notions, as appearing with regard to these objects,-notions which differ in character from all notions described before-
या जाणिवा निर्माण होण्यासाठी आधी वर्णन केल्याप्रमाणे दुसरे कोणतेही कारण घडत नसल्याने
अत्रनिमित्तम्सकालः ।
We conclude ‘Time’ to be the basis of these.
आपण या निष्कर्षाला येतो की त्याला काल हेच कारण आहे.
६.२: ६३सर्वकार्याणाम् चोत्पत्तिस्थितिविनाशहेतुस्तद्व्यपदेशात्।
Time is the cause or basis of the production, persistence and destruction (or cessation) of all produced things; as all these are spoken of in terms of time.
वस्तू निर्माण होणे, ती टिकणे व तिचा नाश होणे या गोष्टींना काळाचा आधार असतो, कारण या गोष्टी काळाच्या संदर्भातच बोलल्या जातात.
क्षणलवनिमेषकाष्ठाकलामुहूर्तयामाहोरात्रार्धमासमासर्त्वयनसंवत्सरयुगकलपमन्वन्तरप्रलयमहाप्रलयव्यवहारहेतुः।
It is also the basis of such conventional usages as ‘kshana’, ‘lava’, ‘nimisha’, ‘kashtha’, ‘kala’, ‘muhurta’, ‘yama’, ‘ahoratra’, ‘ardhamasa’, ‘masa’. ‘rutu’, ‘ayana’, ‘samvatsara’, ‘pralaya’, and ‘mahapralaya’.
नेहमीच्या वापरातील ‘क्षण’, ‘लव’, ‘निमिष’, ‘काष्ठ’, ‘कला’, ‘मुहूर्त’, ‘याम’, ‘अहोरात्र’, ‘अर्धमास’, ‘मास’, ‘ऋतु’, ‘अयान’, ‘संवत्सर’, ‘प्रलय’ आणि ‘महाप्रलय’ या गोष्टींनाही काळ हाच आधार आहे.
६.२: ६३तस्यगुणाःसंख्यापरिमाणपृथक्त्वसम्योगविभागाः।
Its qualities are – Number, Dimension, Separateness, Conjunction and Disjunction.
संख्या, परिमाण, वेगळेपणा, जुळणे आणि वेगळे होणे हे काळाचे गुणधर्म होत.
काललिङ्गाविशेषादेकत्वम्सिद्धम् ।
Its unity is proved by the fact of the distinguishing feature of the time being common (to all periods of it).
काळाच्या सर्व विभागांमध्ये काळ हा एकच एक समान असल्या कारणाने काळाचा एकपणा आणि अखंडपणा सिद्ध होतो.
तदनुविधानात्पृथक्त्वम् ।
From that follows its separateness.
त्या विधाना मुळे काळ हा इतर द्रव्यांपेक्षा वेगळा आहे हे सुद्धा सिद्ध होते.
कारणेकालैतिवचनात्परममहत्परिमाणम्।
The declaration that the name Kala applies to the cause in the Sutra indicates the presence in Time of the greatest dimension.
सूत्रामध्ये प्रत्येक कारणाशी काळ जोडलेला असतो असे म्हटले असल्याने काळाचे परिमाण हे अतिशय मोठे आहे असे लक्षात येते.
कारणपरत्वादिवचनात् सम्योगः ।
The declaration of the posteriority and priority of the cause causing the notions of posteriority and priority indicates the presence of conjunction.
प्रत्येक कारणाच्या आधीची स्थिती व नंतरची स्थिती असे संदर्भ येत असल्याने काळ हा त्या कारणाला येऊन जुळतो हे लक्षात येते.
६४तद्विनाशकत्वाद्विभागैति
And there would be disjunction as the destroyer of this conjunction.
आणि त्यानंतर काळ त्या कारणाला सोडून निघूनही जातो म्हणजे काळात विभाग होतात हे लक्षात येते.
६.२: । तस्याकाशवद्द्रव्यत्वनित्यत्वेसिद्धे
The fact of time being a substance and that of its being eternal are proved as in the case of Akasha.
आकाशाच्या संदर्भात बोलल्याप्रमाणे काळ हे एक वेगळे द्रव्य असून ते अनादि-अनंत आहे हे सिद्ध झाले आहे.
काललिङ्गाविशेषादंजसैकत्वे[म्ऽ]पिसर्वकार्याणाम्
आरम्भक्रियाभिनिर्वृत्तिस्थितिनिरोधोपपाधिभेदान्मणिवत्पाचकवद्वानानात्वोपचारैति ॥
Though from the uniformity of the distinguishing character of time, time is directly by itself, one only, yet it is indirectly or figuratively spoken as manifold, on account of the diversity among the conditions afforded by the production, persistence and cessation of all produced things; just as we have (diversity) in the case of the Gem or the Cook.
काळ हा एकच असला तरीही विविध घटनांच्या संदर्भात त्याचे आधी व नंतर असे विभाग होत असल्याने त्याचे अप्रत्यक्षपणे वेगवेगळे विभाग होतात. हे काळाचे विभाग विविध वस्तूंचे तयार होणे, टिकून राहणे व नष्ट होणे अशा प्रकारच्या घटनांमुळे निर्माण होतात. या मुळेच विविध हिरेमाणके किंवा स्वयंपाकातील विविध पदार्थांप्रमाणेच काळचेही (अप्रत्यक्ष) प्रकार निर्माण होतात.
मूळ कथा: मुखपृष्ठ
प्रशस्तपादभाष्याची अनुक्रमणिका : पदार्थधर्मसंग्रह – प्रशस्तपाद ऋषी