६.३: ६६.२०-दिक्पूर्वापरादिप्रत्ययलिङ्गा ।
Space is the cause or the basis of the notions of East, West and others.
पूर्व, पश्चिम इत्यादींची जाणीव होण्याला दिक् हे द्रव्य आधारभूत होते किंवा संदर्भ देते.
मूर्तद्रव्यमवधिम्कृत्वामूर्तेष्वेवद्रव्येष्वेतस्मादिदम् पूर्वेणदक्षिणेनपश्चिमेनोत्तरेणपूर्वदक्षिणेनदक्षिणापरेणअपरोत्तरेणौत्तरपूर्वेणचाधस्तादुपरिष्टाच्चेतिदशप्रत्ययायतोभवन्तिसादिगिति ।
That is to say, it is that from which arise the ten notions – of East, South-East, South, South-West, West, North-West, North, North-East, Below and Above –with regard to one corporeal (material) object considered with the reference to another material object as the starting point or the limit.
याचाच अर्थ असा की या दिक् द्रव्यामुळेच दिशांच्या दहा जाणीवा होतात – पूर्व, दक्षिणपूर्व, दक्षिण, दक्षिणपश्चिम, पश्चिम, पश्चिमोत्तर, उत्तर, पूर्वोत्तर, खाली आणि वर. या जाणिवा एका जाणिवेला कळणाऱ्या वस्तूला आरंभस्थान किंवा मर्यादा मानून त्यापासून दुसऱ्या वस्तूचे स्थान ठरवताना निर्माण होतात.
६.३: ६६अन्यनिमित्तासम्भवात् ।
Specially so, as there is no other cause available for these notions.
मुख्य म्हणजे या जाणिवा व्हावयाला दुसरे कुठलेच द्रव्य कारण नसते.
६.३: ६७तस्यास्तुगुणाःसंख्यायपरिमाणपृथक्त्वसम्योगविभागाःकालवदेतेसिद्धाः।
Its qualities are : Number, Dimension, Separateness, Conjunction and Disjunction. The presence of these in Space are to be shown as indicated by the Sutra, in the same way as in the case of Time.
दिक् द्रव्याचे गुणधर्म म्हणजे : संख्या, परिमाण, वेगळेपणा, जुळणे आणि निघून जाणे. वैशेषिक सूत्रात म्हटल्या प्रमाणे दिक् द्रव्याचे अस्तित्त्व काळ द्रव्याप्रमाणेच दाखवता येते.
दिग्लिङ्गाविशेषादंजसैकत्वेऽपिदिशः
Though the character of space by itself is uniform and one only.
दिक् द्रव्य हे सर्वत्र एकसमानच असून ते सर्वत्रच संचलेले असते.
परममहर्षिभिः श्रुतिस्मृतिलोकसंव्यवहारार्थम्मेरुम्प्रदक्षिणमावर्तमानस्यभगवतःसवितुर्येसम्योगविशेषाःलोकपालपरिगृहीतदिक्प्रदेशानामन्वर्थाःप्राच्यादिभेदेनदशविधाःसंज्ञाःकृताःतो भक्त्यादशदिशःसिद्धाः ।
Yet, for the sake of the usages of the Shruti, the Smrutis and the ordinary people the great Rishis have coined the ten literal names. Prach(East) and the rest – which pertain of the contact of the Sun, revolving round the Meru, with the ten points of space presided over by the ten Deities. Thus then it is only indirectly or figuratively that we speak of the ‘ten quarters’.
परंतु श्रृती, स्मृती आणि सामान्य जनांच्या वापरासाठी महर्षिंनी पूर्व इत्यादि दहा नावे निश्चित केली. मेरूपर्वता भोवती फिरणारा सूर्य त्या पर्वताभोवतीच्या आकाशात ज्या दहा मुख्य ठिकाणी स्पर्श करतो, त्या दहा ठिकाणी दहा देवतांची अधिष्ठाने आहेत. म्हणजेच केवळ जाणिवेच्या रूपातच आपण ‘दहा तुकड्यां’विषयी बोलतो.
६.३: ६७तासामेवदेवतापरिग्रहात् पुनर्दशसंज्ञाभवन्ति।
To these quarters is given another set of names based on the names of the deity presiding over each of them.
या दहा ठिकाणी असणाऱ्या देवतांवरूनही दिक् द्रव्याच्या या तुकड्यांना दहा नावे आहेत.
माहेन्द्रीवैश्वानरीयाम्यानैरृतीवारुणीवायव्याकौवेरी
ऐशानीब्राह्मीनागीचेति ।
viz. Mahendra (East), Vaishwanara(South East), Yamya (South), Nairhutya (South West), Varuna (West), Vayavya (North West), Kubera (North), Ishanya (North East), Brahma (Above), and Nagi (Below).
ही नावे म्हणजे महेन्द्र(पूर्व), वैश्वानर (दक्षिण-पूर्व), याम्य(दक्षिण), नैऋत्य(दक्षिण-पश्चिम), वरुण (पश्चिम), वायव्य(पश्चिमोत्तर), कुबेर(उत्तर), ईशान्य(पूर्वोत्तर), ब्रह्म(वर) आणि नाग(खाली).
संबंधित भौतिकशास्त्रीय संकल्पना:
- दिक् व काल: विश्वव्यापी व विश्वगामी हेरांची जोडगोळी (Space and Time: The Omnipresent duet of ‘Selfless’ Observers)
- द्रव्यांचे जागा बदलणे हे काळाचे फलित कसे? (How come displacement of substance becomes a function of time?)
- निरीक्षकाची स्थिती – गती चौकट आणि सहनिर्देशक पद्धती (Frame of reference and coordinate system)
मूळ कथा: मुखपृष्ठ
मूळ संदर्भ: पदार्थधर्मसंग्रह – प्रशस्तपाद ऋषी