प्रकरण ४ भाग ९: आत्मा (Discussion on characteristics, properties and classification of Self/Soul)

६.४: ६९.६-आत्मत्वाभिसम्बन्धादात्मा ।

Atma is that which belong to the class Atma.

आत्मा या वर्गात मोडणाऱ्या सर्व आत्म्यांचा हा ‘आत्मा’ गट आहे.

तस्यसौक्ष्म्यादप्रत्यक्षत्वेसति करणैःशब्दाद्युपलब्ध्यनुमितैःश्रोत्रादिभिःसमधिगमःक्रियते । वास्यादीनाम्करणानाम्कर्तृप्रयोज्यत्वदर्शनात् शब्दादिषुप्रसिद्ध्याचप्रसाधकोऽनुमीयते ।

In as much as it is extremely subtle in its character, and as such imperceptible, its cognition is brought about by means of the organs of hearing etc, as inferred from the perception of sound etc, – aided by the fact of such instruments as the axe and the like being always operated by a doer or agent.

आत्मा हा अतिशय सूक्ष्म किंवा तरल असून तो ज्ञानेंद्रियांना कळत नाही. त्याचे अस्तित्व मात्र ज्ञानेंद्रियांच्या सहाय्याने जाणून घेता येते. उदाहरणार्थ, कोणी कुऱ्हाडीने लाकूड तोडत असल्यास त्या तोडण्याच्या आवाजामुळे ‘कुणीतरी’ ती तोडण्याची क्रीया करीत आहे हे कळते. हा ‘कुणीतरी’ म्हणजेच आत्मा.

६.४: ६९नशरीरेन्द्रियमनसामज्ञत्वात् ।

In the cognitions of sound etc. also we infer a ‘cognizer.’ This character cannot belong to the body, or to the sense-organs, or to the mind; because all these are unintelligent or unconscious.

आवाज होणे याचा आपण विचार करतो तेव्हा तो कोणीतरी करतोय असा आपण निष्कर्ष काढतो. पार्थिव शरीर किंवा ज्ञानेंद्रिये ही अबुद्ध किंवा अजाण असल्यामुळे त्यांना हा गुण चिकटू शकत नाही.

नशरीरस्यचैतन्यम्घटादिवद्भूतकार्यत्वात्मृतेचासम्भवात् ।

Consciousness cannot belong to the body as it is a material product like the jar; and also as no consciousness is found in the dead bodies.

शरीर हे एखाद्या घड्याप्रमाणे असल्याने त्याला जाणीव नसते कारण मृतव्यक्तीच्या शरीरात जाणीवेचा अभाव असतो.

नेन्द्रियाणाम्करणत्वातुपहतेषुविषयासान्निध्येचानुस्मृतिदर्शनात्।

Nor can consciousness belong to the sense-organs, because these are mere instruments, and also because we have remembrances of objects even after the sense organ has been destroyed, and even when the object is not in contact with the organ.

ज्ञानेंद्रियांचा नाश झाला किंवा त्यांच्या संपर्कात वस्तू राहिली नाही तरीही आपल्याला त्या वस्तूसंबंधातली स्मृती असतेच. या बरोबरच ज्ञानेंद्रिये ही निव्वळ उपकरणे असल्याने त्यांच्यातही जाणीवेचा अभाव असतो.

६.४: ६९नापिमनसःकरणान्तरानपेक्षित्वेयुगपदालोचनस्मृतिप्रसङ्गात् स्वयम्करणभावाच्च ।

Nor can it belong to mind, because if the mind be regarded as functioning independently of other organs, then we would have perception and remembrance simultaneously presenting themselves (and if the mind be regarded as functioning through the other organs, then it would be the same as ‘Atma’); and also because the mind itself is a mere instrument.

जाणीवेला आपण मनाशीही जोडू शकत नाही कारण मन हे अन्य अवयवांपेक्षा वेगळे राहून काम करते असे आपण गृहित धरले तर आपल्याला एकाच वेळी प्रत्येक वस्तूची स्मृती व संबंधित अनुभव मिळेल (आणि मन हे जर इतर अवयवांच्या माध्यमातून काम करते असे धरले तर मन हेच आत्मा होईल.) दुसरे कारण हेही आहे की मन हे सुधा एक साधन आहे.

atma_charioteer

परिशेषादात्मकार्यत्वात्तेनात्मासमधिगम्यतेशरीरसमवायिनीभ्याम्चहिताहितप्राप्तिपरिहारयोग्याभ्याम्प्रवृत्तिनिवृत्तिभ्याम्

रथकर्मणासारथिवत्प्रयत्नवान्विग्रहस्याधिष्ठातानुमीयतेप्राणादिभिश्चेति ।

And thus the only way thing to which the consciousness could belong is the self, which thus is cognized by the consciousness. And from the motion of the chariot we infer the existence of an intelligent guiding agent in the shape of the charioteer, so also we infer an intelligent guiding agent for the body, from the activity and cessation from the activity appearing in the body, which have the capacity of acquiring the desirable and avoiding the undesirable object. The intelligent agent is also inferred from the actions of breathing etc.

त्यामुळे जाणीवेचा संबंध आपण केवळ आत्म्याशीच लावू शकतो म्हणजेच आत्म्याला आपण जाणीवेच्या माध्यमातून जाणून घेऊ शकतो. आणि रथाच्या हालचालीच्या माध्यमातून आपल्याला त्या रथाचे सारथ्य करणाऱ्या हुशार सारथ्याची जाणीव होते. त्याचप्रमाणे आपल्या शरीराचाही एक हुशार सारथी असून तो शरीरातील सर्व हालचाली घडवून आणण्याबरोबरच त्यांना थांबवूही शकतो आणि त्याच्यात हव्या त्या गोष्टी घेण्याची व नको त्या गोष्टी टाळण्याची कुवत असते. या बुद्धिमान चालकाचे अस्तित्व श्वसन इत्यादि क्रियांमधूनही जाणवते.

atma_flutist

६.४: ६९कथम्शरीरपरिगृहीते वायौविकृतकर्मदर्शनाद्भस्त्राध्मापयितेव

“How?” When we perceive a variegated functioning of the air contained in the body (we infer the existence of the guiding agent) who act like the blower of the windpipe.

“श्वसनातून आत्म्याचं अस्तित्व कसं जाणवतं?” या प्रश्नाचं उत्तर म्हणजे शरीराच्या वेगवेगळ्या भागातील (प्राण, अपान, उदान, समान इत्यादि) वायू हे जेव्हा वेगवेगळी कार्ये करत असतात तेव्हा आत्मा हाच त्या श्वासनलिकेत हवा भरण्याचेच जणू काम करत असतो.

atma_pulley

निमेषोन्मेषकर्मणानियतेनदारुयन्त्रप्रयोक्तेव

From the regular action of winking up and down, we infer the existence of the agent who would be like the puller of a pulley.

पापण्यांची जेव्हा उघडझाप होत असते तेव्हा त्यातून कुणीतरी जणू एखाद्या कप्पीला चालवूनच ही उघडझाप करतंय असा निष्कर्ष आपण काढू शकतो.

atma_houseOwner

देहस्यवृद्धिक्षतभग्नसंरोहणादिनिमित्तत्वात् गृहपतिरिव

From the fact of the wounds of the body being healed up, we infer the existence of the agent who would be like the master of the body repairing it.

शरीराची वाढ होईल हे पाहणे, शरीराला झालेली जखम भरून काढणे या सारख्या क्रीयांमधून शरीराची काळजी कोणीतरी घरमालक घेत आहे हे कळते.

atma_lingorcha

६.४: ७० अभिमतविषयग्राहककरणसम्बन्धनिमित्तेनमनह्कर्मणागृहकोणेषुपेलकप्रेरकैव दारकः

From the action of the mind towards the contact of the sense-organs apprehending desirable objects, we infer the existence of an agent who would be like the boy in a corner of the house throwing a ball (to another ball stuck in the ground)

मनाचा संपर्क ज्ञानेंद्रियाशी होऊन त्याद्वारे इच्छित वस्तू प्राप्त करण्याच्या क्रीयेच्या माध्यमातून कुणीतरी एखाद्या लहान मुलासारखा कोपऱ्यातून चेंडू फेकतोय व त्याद्वारे जमिनीवरचा दुसरा चेंडू उडवतोय असे लक्षात येते.

नयनविषयालोचनानन्तरम्रसानुस्मृतिक्रमेणरसनविक्रियादर्शनादनेकगवाक्षान्तर्गतप्रेक्षकवद्

उभयदर्शीकश्चिदेकोविज्ञायते ।

When we see an object by the eye, and then recalling the taste of that object, we find a certain modification appearing in the organ of taste; from this we infer the existence of a single guiding agent for the two operations, like a person looking through two windows..

जेव्हा आपण डोळ्यांनी एखादी वस्तु पाहतो आणि त्या वस्तूची चव आठवतो तेव्हा रसनेंद्रियात म्हणजे जिभेत नक्कीच बदल होतो(आवडीच्या पदार्थाबाबतीत पाणी सुटते). यातून आपण असा निष्कर्ष काढून शकतो की या बघण्याच्या व जिभेच्या क्रीया घडवून आणणारा एकच असून, तो दोन खिडक्यांतून बाहेर पाहणाऱ्या माणसा सारखा असतो.

६.४: ७०सुखदुह्खेच्छाद्वेषप्रयत्नैश्चगुणैर्गुण्यनुमीयतेतेचनशरीरेन्द्रियगुणाः

Then again, from the qualities of pleasure, pain, desire, aversion and effort, we infer the existence of one whom these qualities belong. These qualities cannot belong either to the body, or to the sense-organs.

त्याशिवाय सुख, दु:ख, इच्छा, द्वेष आणि प्रयत्न या गुणांवरून असे अनुमान काढता येते की हे गुण ज्याचे आहेत असा कोणीतरी आहे. हे गुण शरीर किंवा ज्ञानेंद्रिये यांचे निश्चितच नाहीत.

कस्मादहङ्कारेणैकवाक्यताभावात्

Because these are found to be coexistent with the notion of ‘I’.

कारण हे सर्व गुण ‘स्व’ किंवा आत्म्याशीच संबंधित आहेत.

प्रदेशवृत्तित्वात्

Because these qualities exist only in certain parts of the object to which they belong.

कारण हे सर्व गुण ज्या वस्तूंमुळे निर्माण होतात त्यांच्या मर्यादित भागा पुरतेच मर्यादित असतात.

यावद्द्रव्यभावित्वात्

Because they are not coeval with their substratum.

कारण हे सर्व गुण ज्या वस्तूंमुळे निर्माण होतात त्यांच्या द्रव्यांशी संबंधित नसतात.

बाह्येन्द्रियाप्रत्यक्षत्वाच्

Because they are not perceptible by the external organs of perception.

कारण या सर्व गुणांची जाणीव ज्ञानेंद्रियांना नसते.

चतथाहंशब्देनापिपृथ्श्श्दिव्यादिशब्दव्यतिरेकादिति ।

The existence of self (as a distinct substance) is also proved by the fact of its being spoken of by means of word ‘I’ which is wholly distinct from the words ‘Earth’, ‘Water’ etc.

जेव्हा आपण ‘मी’ असे म्हणतो तेव्हा स्व किंवा आत्म्याचे एका वेगळ्या द्रव्याच्या स्वरूपातील अस्तित्व लक्षात येते कारण ते पृथ्वी(स्थायू), आप(द्रव) या द्रव्यांपेक्षा वेगळे असते.

६.४: ७०तस्यगुणाःबुद्धिसुखदुह्खेच्छाद्वेषप्रयत्नधर्माधर्मसंस्कारसंख्यापरिमाणपृथक्त्वसम्योगविभागाः।

The qualities of the self are, these: Intelligence, Pleasure, Pain, Desire, Aversion, Effort, Virtue, Vice, Faculty, Number, Dimension, Separateness, Conjunction and Disjunction.

आत्म्याचे गुण पुढीलप्रमाणे आहेत: बुद्धि, सुख, दु:ख, इच्छा, द्वेष, प्रयत्न, धर्म(नैसर्गिक आचरण), अधर्म(अनैसर्गिक आचरण),संस्कार, संख्या, परिमाण, वेगळेपणा, जुळणे आणि वेगळे होणे.

आत्मलिङ्गाधिकारेबुद्ध्यादयःप्रयत्नान्ताःसिद्धाः।

The Sutra dealing with the distinguishing features of the self has mentioned qualities, from intelligence down to effort.

आत्म्याची विशिष्ट लक्षणे विशद करणाऱ्या वैशेषिक सूत्रात या लक्षणांची सुरुवात बुद्धिपासून होते व शेवट संस्कार या गुणाने होतो.

६.४: ७०धर्माधर्मावात्मान्तरगुणानामकारणत्ववचनात्

The presence of virtue and vice is indicated by the mention of the fact of the qualities of one self not being the cause of the appearance of a quality in another self.

वैशेषिकातील गुणानाम कारणत्व या वचनानुसार धर्म आणि अधर्म हे गुण आत्म्यामुळेच असतात हे सांगितले गेलेले असून एका आत्म्यापासून हे गुण दुसऱ्याला मिळत नाहीत हे ही सांगितलेले आहे.

संस्कारःस्मृत्युत्पत्तौकारणवचनात् ।

The presence of Sanskar and Memory is due to Self as mentioned in the Vaisheshik Sutra.

वैशेषिकातील स्मृती उत्त्पत्ती कारण या वचना नुसार आत्मा हाच संस्कार व स्मृती यांच्या उत्त्पत्तीला कारण असतो हे सागितलेले आहे.

व्यवस्थावचनात् संख्या पृथक्त्वमप्यतएव

The presence of number is indicated by the mention of restriction; and from that follows separateness.

वैशेषिकातील व्यवस्था वचनानुसार संख्या हा आत्म्याचा गुण असून त्यामुळेच आत्मे वेगवेगळे असतात हेही सिद्ध होते.

तथाचात्मेतिवचनात्परममहत्परिमाणम् ।

The greatest dimension of the self is mentioned in the Sutra ‘so is the self also’.

आत्म्याचे परिमाण हे सर्वात मोठे असून तसे ‘आत्मेति वचनात’ सांगितलेले आहे.

६.४: ७०सन्निकर्षजत्वात्सुखादीनाम्सम्योगः । तद्विनाशकत्वाद्विभागैति ॥

The fact of pleasure etc. being due to contact proves the existence of conjunction in the self; and disjunction is the destroyer of that conjunction.

आत्म्याचे इतरांशी जोडले गेल्यामुळेच सुख इत्यादि गुणांची जाणीव होते त्यामुळे ‘दुसऱ्याशी जुळणे’ हा आत्म्याचा गुण आहे हे कळते. त्याचीच दुसरी बाजू म्हणजे इतर द्रव्याशी जुळलेला आत्मा त्या द्रव्यापासून विलग झाला की दु:खाची जाणीव होते हे कळते.

मूळ कथा: मुखपृष्ठ

पदार्थधर्म संग्रह अनुक्रमणिका: पदार्थधर्मसंग्रह – प्रशस्तपाद ऋषी