६.५: ८९.८-मनस्त्वयोगान्मनः ।
The Mind is so called, because of its belonging to the class ‘Mind’.
सर्व मने ही ‘मन’ या गटात मोडत असल्याने त्यांना मन म्हटले जाते.
सत्यप्यात्मेन्द्रियार्थसान्निध्येज्ञानसुखादीनामभूत्वोत्पत्तिदर्शनात्करणान्तरमनुमीयते ।
Even when there is a proximity of the object to the soul and the sense-organ, we find that cognition, pleasure etc. do not appear and from this we infer the necessity of an instrumentality other than the aforesaid proximity.
एखादी वस्तू आत्मा आणि ज्ञानेंद्रियांच्या सान्निध्यात असली तरीही त्याविषयी जाणीव आणि आनंद वगैरे भावना निर्माण होत नाहीत आणि त्यातून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की (या जाणिवा निर्माण होण्यासाठी) या दोहोंशिवाय तिसऱ्या कोणत्यातरी साधनाची गरज आहे.
श्रोत्राद्यव्यापारेस्मृत्युत्पत्तिदर्शनात्बाह्येन्द्रियैरगृहीतसुखादिग्राह्यान्तरभावाच्चान्तह्करणम् ।
Then again we find that due remembrance appears even when there is no functioning of the organs of hearing etc and that the objects of this means or instrument are pleasure etc. which are not cognisable by external sense organs ; and from these two facts we infer the fact of that instrument being internal.
शिवाय आपले कान इत्यादि अवयव जरी ऐकत नसले तरीही काही आवाज, चवी आपल्याला जाणवतात व यांच्या आठवणीतून आनंद इत्यादि भावना होतात पण असे होताना कोणतेही ज्ञानेंद्रिय सहभागी झालेले नसते आणि यातून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की ही जाणिव व्हायचे इंद्रिय हे अंतर्गतच असते.
६.५: ८९तस्यगुणाःसंख्यापरिमाणपृथक्त्वसम्योगविभागपरत्वापरत्वसंस्काराः।
The qualities of the mind are – number, dimension, separateness, conjunction, disjunction, priority, posteriority and the ability to apply force.
मनाचे गुणधर्म पुढीलप्रमाणे – संख्या, मोजमाप, वेगळेपणा, जुळणे, वगळं होणे, आधी येणे, नंतर येणे आणि बळ प्रयुक्त करणे.
प्रयत्नज्ञानायौगपद्यवचनात्प्रतिशरीरमेकत्वम्सिद्धम्।
The sutra asserts the non-simultaneous nature of effort and knowledge and it proves that there is one mind to each body.
वैशेषिक सूत्रानुसार प्रयत्न व ज्ञान हे कधीच एका वेळी घडत नाहीत व याचाच अर्थ प्रत्येक शरीरात एकच मन असते असा होतो.
पृथक्त्वमप्यतएव।
From this follows separateness.
यातून असेही कळते की प्रत्येक मन हे दुसऱ्यापासून वेगळे असते.
तदभाववचनादणुपरिमाणम् ।
The Sutra speaking of the absence in the mind of that (largeness) indicates its atomic dimension.
वैशेषिकातील अभाव वचनातून आपल्याला हेही कळते की मन हे आकाराने मोठे नसून ते अणुइतक्या आकाराचे म्हणजेच अतिसूक्ष्म असते.
६.५: ८९अपसर्पणोपसर्पणवचनात्सम्योगविभागौ ।
The mention of moving to and moving away indicates the presence in it of conjunction and disjunction.
वैशेषिकातील अपसर्पणोपसर्पण या वचनानुसार आपल्याला हे कळते की मन हे एखाद्या विषयाशी जाऊन जुळते व नंतर वेगळे होते.
मूर्तत्वात्परत्वापरत्वेसंस्कारश्च।
Its corporeal or material character indicates priority, posteriority, as also the ability to apply force.
मनाच्या मूर्तत्वावरून हे लक्षात येते की ते वस्तूच्या आधी व नंतर असू शकते आणि ते बळाचा प्रयोग करु शकते.
अस्पर्शवत्त्वाद्द्रव्यानारम्भकत्वम्।
The mention of the absence of tangibility indicates its being unproductive of substances.
मनाची जाणिव स्पर्शाने होत नाही याचाच अर्थ असा की मन हे कोणतीही ‘जड’ वस्तू निर्माण करु शकत नाही.
क्रियावत्त्वान्मूर्तत्वम्।
Having action/movement it must be corporeal or material.
ते हालचाल करते किंवा इकडे तिकडे फिरते याचाच अर्थ मनाला मूर्तत्व किंवा जाणिव स्वरूप अस्तित्व असावे असा होतो.
साधारणविग्रहवत्त्वप्रसङ्गादज्ञत्वम् ।
It must be regarded as unconscious; as otherwise the whole body would be the common ground (of all experiences or sensations).
मनाला स्वत:ला कोणतीही जाणिव किंवा शुद्ध नसावी, नाहीतर पूर्ण शरीर हे सर्व अनुभव आणि जाणिवा यांचे संयुक्त केंद्र झाले असते.
६.५: ८९करणभावात्परार्थम् ।
Being an instrument it must be subservient to the purpose of something else.
मन हे केवळ एक साधन असल्याने ते दुसऱ्या कोणाच्यातरी(आत्म्याच्या) हेतूंची पूर्तता करत असावे.
गुणवत्त्वाद्द्रव्यम्।
Having qualities it must be regarded as a substance.
मनाचे स्वत:चे गुणधर्म असल्याने त्याच्याकडे द्रव्य म्हणूनच पाहिले जावे.
प्रयत्नादृष्टपरिग्रहवशादाशुसञ्चारिचेति ॥
And it must move quickly, in as much as it includes within itself all effort and the unseen forces (of the soul’s) actions.
मन हे अतिवेगवान असून तो वेग (आत्म्याने) प्रयत्न केल्याने व अदृष्य बळ प्रयुक्त केल्याने प्राप्त होतो.
६.०: ८९इतिप्रशस्तपादभाष्येद्रव्यपदार्थः॥
So the chapter on Dravya Padartha comes to an end.
अशा रीतीने प्रशस्तपाद भाष्याचा द्रव्यपदार्थ नावाचा धडा संपला.
प्रशस्तपादभाष्य अनुक्रमणिका : पदार्थधर्मसंग्रह – प्रशस्तपाद ऋषी
मूळ कथा: मुखपृष्ठ