Author: scitechinmarathi

विजेची गोष्ट : १: वीज काय आहे आणि ती वाहते कशी (Electricity: What it is and how does it flow?)

(~ इस  १७०० ते ~ इस १७६०) अमावास्येच्या अतिभयंकर रात्री तशा विक्रमासाठी नित्याच्याच झालेल्या. राजाच्या आयुष्यातला रोजचा दिवस नवा.   आजच तो प्राणिशाळेत जाऊन आला होता  भयंकर प्राण्यांच्या सान्निध्यात राहून राहून माणसांना जसं त्या प्राण्यांना कसं वागवावं याचं ज्ञान होत जातं, त्या […]

Electromagnetism चा बहुमुखी  वैश्वानल  : बरसणारे इलेक्ट्रॉन्स, वेटोळे घालणारे चुंबकत्व, उधळणारे  फोटॉन्स,…,आणि फॅरेडेची अफाट बुद्धिमत्ता         

अशीच एक  पावसाळी, घोर अपरात्र वाटावी अशी अवसेची रात्र. दूर जिथे पाहावे तिथपर्यंत काळा कभिन्न अंधार पडलेला. आकाशात काळे ढग दाटून आल्याने रात्रीचा गडद पणा अधिकच वाढवलेला… क्षितीजाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत ढगांचा वेढा पडल्यावर, साऱ्या आसमंताला बंदिवासात टाकल्यावर, जेलरने […]

Four fundamental forces  बहुरूपी, बहुढंगी, बहुत ‘लोकां’सी चालवणाऱ्या बलांची चतुरंग सेना 

राजा विक्रमाच्या राज्यात अभूतपूर्व अशी भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. विक्रमाच्या राज्यातच नव्हे तर संपूर्ण विश्वातच एक भयंकर रोगाची साथ आली होती. नवा रोग, नवी लक्षणे, नवीन उपचार, नवीन लस या सर्वात जगाचं लक्ष तर होतंच पण या रोगामुळे […]

पदार्थ जडरूप (मॅटर) असो वा ऊर्जारूप (एनर्जी), प्रकाश कायमच सोबतीला असतो.. (e = m. c^2)

आज राजा विक्रमाच्या राजदरबारात राजगुरूंनी रामायणकथा ऐकवली. एक दोन  दिवस नव्हे तर पूर्ण आठवडाभर. रामाची कहाणी, म्हणजे विष्णूच्या अवताराची कहाणी, लहानपणापासून रामाचं दिसलेलं`शौर्य, धैर्य, मग गुरुगृहातून घरी आल्यावर लगेचच गुरु विश्वामित्र यांच्या यज्ञाचे राखसांपासून रक्षण […]

लहरींचा गुंता : सुर – बेसुर, रंग – बेरंग (Interference of Waves like Photons and Sounds)

विक्रमाच्या राज्यात नुकताच एक संगीत, नाट्य, चित्रकला, मूर्तिकला, काष्ठकला कर्मींचा मेळा एक आठवडाभर आयोजित केला होता. देशोदेशींच्या चित्रकारांनी, मूर्तिकलाकारांनी, गायकांनी, वादकांनी, समूहवादकांनी,[…]

स्थल -काल यांच्यातलं ‘सेटिंग’ (Einstein and Space -Time Singularity )

विक्रमाच्या राज्यात हाहाकार उठला होता. जोतो जिवाच्या भयाने त्रस्त झाला होता. झालं काय होतं की त्याच्या शेजारच्या राजाने विक्रमावर हल्ला करण्यासाठी छुपी रणनीती वापरली होती. सरळ युद्ध करण्यापेक्षा शेजारच्या राजाने त्याच्या हेराकरवी भयंकर असे रोगट […]

वजनदार ग्रह -तारे आणि स्थळ -काळाची अदृष्य इलास्टीक झोळी (Einstein’s theory of relativity and bending of space-time due to planets and stars)

विक्रम राजाला अजूनही दुपारच्या सर्कस मध्ये झालेला प्रसंग आठवत होता. अगदी जसाच्या तसा. राजधानीत एक सर्कस आली होती अगदी जगप्रसिद्ध. सर्कशीच्या कारागिरांनी एक दोन आठवडे खपून एक अतिभव्य तंबू उभारला होता, अगदी त्यात १५-२० इमारती […]

ऊर्जा नावाचा बहुरुपी कलाकार (Law of conservation of energy)

विक्रमाच्या हेरांच्या ताफ्यात अनेक प्रकारचे हेर होते, काही राज्यात सतत फिरून बातम्या काढणारे तर काही बाहेरच्या राज्यात, शत्रूंच्या राज्यात फिरून, जीवावरचा धोका पत्करून देशनिष्ठा बाळगून देशाशी इमान राखणारे, देशाच्या सुरक्षिततेची काळजी वाहणारे, देशाच्या शत्रूंवर नजर […]